कॉ.पानसरे हत्याप्रकरण : समीर गायकवाडवर आरोपपत्र दाखल

कॉ.पानसरे हत्याप्रकरण : समीर गायकवाडवर आरोपपत्र दाखल

  • Share this:

Sameer Gaikwad

14 डिसेंबर :  कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडवर 392 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. कोल्हापूर पोलीस आणि एसआयटीने हे आरोपपत्र दाखल केलं असून न्यायालयाने हे आरोपपत्र स्विकारलं आहे.

समीर गायकवाडला कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं. समीर गायकवाडची न्यायालयीन कोठडी संपण्यापूर्वी पोलिसांनी आज 392 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे.

यादरम्यान, काही महत्वाचा मुद्देमालासह काही महत्वाचे तपशिल पोलिसांनी यात नमूद केले आहेत. त्यात समीरच्या मोबाईल संभाषणाची सीडी, काही धार्मिक पुस्तक आणि पानसरे यांच्यावर जी गोळी झाडली होती, त्याच्या तपशीलाचा समावेश आहे. तसंच यामध्ये 77 साक्षीदारांचा आणि नातेवाईकांचा जबाबाचाही समावेश करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: December 14, 2015, 2:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading