बापूंनी घेतली साध्वीची भेट

बापूंनी घेतली साध्वीची भेट

16 फेब्रुवारीआसाराम बापू यांनी मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंगची भेट घेतली. साध्वीवर नाशिकच्या आयुर्वेद सेवासंघाच्या आयुर्वेद रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे जाऊन आसारामबापूंनी साध्वीची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत साध्वी प्रज्ञासिंगची बहीण आणि मेहुणे होते. बापूंनी यावेळी साध्वीला द्राक्ष आणि मिठाईचे दोन बॉक्स भेट दिले.मीडियाशी बोलण्यास बंदीया भेटीसाठी आसारामबापू यांनी जेल सुपरिटेंडेंट स्वाती साठे यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार प्रज्ञासिंग हिने या भेटीस लेखी होकार कळवला होता. पण भेटीत झालेले बोलणे मीडियाला सांगायचे नाही या तसेच इतर अटींवर आसारामबापूंना या भेटीची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार बापू मीडियाशी बोलले नाहीत. हिंदुत्त्ववादी प्रतिमेसाठीबापूंच्या गुजरातमधील सुरत आणि अहमदाबाद येथील आश्रमांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गुजरातमध्ये सध्या नरेंद्र मोदींचे भाजप सरकार आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वीची भेट घेऊन आपण कडवे हिंदुत्त्ववादी आहोत, अशी गुजरात सरकारसमोर प्रतिमा निर्माण करण्यासाठीच बापूंनी हा भेटीचा खटाटोप केल्याचे बोलले जात आहे. 'सामना'ची भलामण नाशिकमधील दिपालीनगर येथील महाशिवरात्री सत्संग महोत्सवाला बापूंनी हजेरी लावली आहे. येथील प्रवचनात बोलताना त्यांनी हिंदुस्थानात खरे अतिरेकी मोकाट फिरत असून साधू, संत, साध्वींना तुरुंगात डांबले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच ज्वलंत हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारे, शिवसेनेचे मुखपत्र सामना वाचता चला, असा सल्लाही त्यांनी आपल्या प्रवचनात दिला. त्यामुळे आपली प्रतिमा प्रखर हिंदुत्त्ववादी व्हावी, आणि ती गुजरात सरकारच्या लक्षात यावी, असाच बापूंचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2010 12:29 PM IST

ताज्या बातम्या