26/11चा हल्ला सिद्ध करू शकणार नाही, हाफीजने स्वराज यांनाच पाठवला व्हिडिअो

26/11चा हल्ला सिद्ध करू शकणार नाही, हाफीजने स्वराज यांनाच पाठवला व्हिडिअो

  • Share this:

hafiz twiit14 डिसेंबर : मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवाही हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईदनं भारताविरोधात पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. मुंबईतील हल्ल्याला 7 वर्षं पूर्ण झाली तरी भारत आपला सहभाग सिद्ध करू शकला नाही, आणि अखेरपर्यंत करू शकणार नाही असं हाफीज सईदनं म्हटलंय. हाफीज सईदनं आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तान दौर्‍यावर नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. 26/11 चा खटला लवकरात लवकर संपवण्यात येईल असं आश्वासन शरीफ यांनी दिलं होतं. शरीफ यांच्या विधानामुळे हाफीज सईदचा पित खवळलं. सईदने ट्विटरवर एक व्हिडिओ टाकला असून यामधून भारतास चेतावणी दिलीये. त्याने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना टॅग करत हा व्हिडिअो पाठवला. या 7 वर्षं झाले तरी भारताला मुंबईवर हल्ला कुणी केला हे सिद्ध करु शकला नाहीत, आणि कधीही तुम्ही सिद्ध करू शकणार नसल्याचं त्याने म्हटलं आहे. तसंच भारत 26/11 हल्ल्याचा पुरावा देण्यात अपयशी ठरलंय असा आरोपही त्याने केलाय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: December 14, 2015, 9:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading