पवारांच्या कार्यक्रमात राज-उद्धव एकाच व्यासपीठावर

पवारांच्या कार्यक्रमात राज-उद्धव एकाच व्यासपीठावर

  • Share this:

raj and uddhav timing12 डिसेंबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शक्यतो कधीच एकत्र दिसत नाही. पण, आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्ताच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी अचूक टायमिंग साधला. राज आणि उद्धव एकाच व्यासपीठावर दिसले. विशेष म्हणजे राज यांचं भाषण सुरू असताना उद्धव व्यासपीठावर आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या वरळी इथल्या नेहरू सेंटरमध्ये सर्वपक्षीय

निमंत्रितांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून शरद पवारांच्या आत्तापर्यंतच्या कार्याची प्रशंसा केली. सगळ्यांची भाषणं संपल्यानंतर सर्वांनी मिळून शरद पवारांचा सत्कार केला. पण, या कार्यक्रमात आकर्षक ठरलं ते राज-उद्धव यांचं टायमिंग...

राज आणि उद्धव ठाकरे कधीच एकत्र येत नाही आणि एकत्र कुठे दिसत नाही. मागील वर्षी शिवतीर्थावर राज आणि उद्धव एकत्र दिसले होते. आणि त्याअगोदर उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल असताना राज यांनी स्वत:हा जाऊन भेट घेतली होती. हे दोन क्षण सोडले तर राज-उद्धव कधी एकत्र दिसले नाही. आजच्या या कार्यक्रमात आधी राज ठाकरे व्यासपीठावर दाखल झाले होते. राज यांचं भाषण सुरू असताना तितक्यात उद्धव ठाकरे यांची एंट्री झाली. उद्धव यांच्या आगमनामुळे टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सूत्रसंचालकांनी उद्धव यांना व्यासपीठावर आपल्या जागेवर स्थानापनं होण्याची विनंती केली. राज यांना आपलं भाषण थांबवावं लागलं आणि जेव्हा उद्धव व्यासपीठावर आले तेव्हा राजही समोर येऊन उद्धवना स्मित हास्य केलं. त्यानंतर राज यांनी आपलं भाषण आटोपलं.

पवारांचा 'सल्ला' ऐकला -राज

एखादी बातमी येते तेव्हा याबद्दल बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार काय विचार करत असतील याचा विचार माझ्या मनात यायचा. माझाच नाहीतर अनेकांना हा प्रश्न पडतो. शरद पवारांकडून खूप काही शिकण्यासारखं असून खूप काही शिकलोही. पवारांनी मला एक सल्ला दिला होता. तो मी ऐकलाही अशी कबुली राज ठाकरे यांनी दिली खरी पण तो काय सल्ला होता याबद्दल पुरावा द्यायचा असेल तर सकाळचा सेल्फी पाठवू का असं सांगत खरा सस्पेन्स उलगडला.

त्यानंतर राज यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. 1986 साली मी लोकसत्ता दैनिकामध्ये मुक्त व्यंगचित्रकार म्हणून काम करत होतो. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा एक देवमासा आणि त्यावर एक होडी. त्या होडीत पवार साहेब बसले. आणि एका किनार्‍यावर मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी असं व्यंगचित्र काढलं होतं. ते व्यंगचित्र पहिल्या पानावर छापलं गेलं. परत दुसर्‍या दिवशी आणखी एक व्यंगचित्र काढलं. तेव्हा संपादक गडकरी यांनी मला सांगितलं शरद पवारांचं व्यंगचित्र काढायचं नाही. तेव्हा मला कळलं अदृश्य शक्ती काय असते ती असं सांगत पवारांच्या पॉवरचा अनुभव सांगितला.

तसंच एखादी गोष्ट पवारांना सांगितल्यावर ताबडतोब दुसर्‍या क्षणी फोन उचलला जातो. हे सगळं दैवी आहे. कुणाच कुठं काय काम चालू असतं आणि किती ठिकाणी लक्ष असतं हे पवारांकडून शिकावं. जेव्हा शरद पवार खूश होता तेव्हा भिती वाटते. मला जर कुणी सांगितलं तुमच्या कामावर पवारसाहेब खुश झाले तेव्हा मी काय चुकलो असा प्रश्न माझ्या मनात येतो. शरद पवारांसारखा नेता महाराष्ट्राला लाभला हे आमचं भाग्य समजतो आणि त्यांना सलाम करतो अशी स्तुतीसुमनंही राज यांनी उधळली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2015 10:16 PM IST

ताज्या बातम्या