रेल्वे प्रशासनाकडून मलमपट्टी, लोकलच्या 40 जादा फेर्‍या वाढवणार

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 12, 2015 10:31 PM IST

mumbai local accident12 डिसेंबर : अपघातांमुळे काळवंडलेली मुंबईची लाईफलाईनला मलमपट्टी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय. मध्य आणि हार्बर लाईनवर 40 जादा फेर्‍या सोडण्यात येणार आहे. तसंच ठाणे- मुलुंड दरम्यान आणखी एका स्टेशनचा प्रस्तावही ठेवण्यात आलाय.

डोंबिवलीकर भावेश निकातेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने एक समिती स्थापन केली. लोकलमध्ये सातत्यानं होणारे अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबद्दल या समितीची एक बैठक आज पार पडली. यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय झाले. येत्या वर्षाच्या जानेवारीपासून मध्य आणि हार्बर लाईनवर 40 लोकलच्या फेर्‍या वाढवण्यात येणार आहेत. ठाणे-वाशी आणि पनवेलसाठी 22, हार्बर मार्गावर 7 आणि कुर्ला ते कल्याण मार्गावर 11 जादा लोकल सोडण्यात येणार आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस या गाड्या धावणार आहे.

तसंच ठाणे रेल्वे स्टेशनवरचा गर्दीचा भार कमी करण्यासाठी ठाणे आणि मुलुंड दरम्यान आणखी एका स्टेशनचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यासाठी ठाण्याच्या स्मार्ट सिटीसाठीच्या बजेटमधून स्टेशनला निधी देण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आलाय. त्याचबरोबर प्रायोगिक तत्वावर खासदार फंडातून बंद दरवाजाचा डबा जानेवारीत चालवला जाईल. 3 ऐवजी 2 आसन व्यवस्था असणारा डबा रेल्वे तयार करणार आहे.

 

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2015 08:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...