ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू खेळणारच

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू खेळणारच

16 फेब्रुवारीआता ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवरून काँग्रेस आणि शिवसेनेत पुन्हा एकदा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. कारण आयपीएलच्या मॅचेस मुंबईत होणारच आणि त्यात खेळणार्‍या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पूर्ण संरक्षणही देणार, असे उत्तर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला दिले आहे. तर महसूलमंत्री नारायण राणेंनीही मुख्यमंत्र्यासोबत शिवसेनेला आव्हान दिले आहे. कालच शिवसेनाप्रमुखांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मुंबईत खेळू देणार नसल्याचा पुनरुच्चार केला होता. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'मातोश्री'वर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2010 09:52 AM IST

ताज्या बातम्या