सचिन-सेहवागची शानदार सेंच्युरी

सचिन-सेहवागची शानदार सेंच्युरी

15 फेब्रुवारीकोलकाता टेस्टमध्ये सेहवाग आणि सचिनच्या सेंच्युरीच्या जोरावर भारतीय टीमने पहिल्या इनिंगमध्ये 46 रन्सची आघाडी घेतली आहे. मॅचच्या दुसर्‍या दिवस अखेर भारताने 5 विकेट गमावत 342 रन्स केले. व्ही व्ही एस लक्ष्मण 9 तर अमित मिश्रा 1 रन्सवर खेळत आहेत. त्याआधी वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरने तिसर्‍या विकेटसाठी तब्बल 249 रन्सची पार्टनरशिप केली. सेहवागने 165 रन्सची धडाकेबाज इनिंग केली. टेस्ट करियरमधली ही त्याची 19वी सेंच्युरी ठरली. अवघ्या 174 बॉलमध्ये त्याने तब्बल 23 फोर आणि 2 सिक्सची बरसात केली. सेहवागपाठोपाठ सचिननेही शानदार सेंच्युरी ठोकली. टेस्ट करियरमधली ही त्याची 47वी सेंच्युरी ठरली आहे. लागोपाठ चार टेस्टमध्ये सेंच्युरी करण्याची कामगिरी त्याने केली आहे. पण सेंच्युरीनंतर सचिन 106 रन्सवर आऊट झाला. यानंतर बद्रीनाथही फार काळ मैदानावर टिकला नाही. अवघ्या 1 रन्सवर स्टेनने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दक्षिण आफ्रिकेतर्फे डेल स्टेन, मॉर्केल, हॅरिस आणि ड्युमिनी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2010 03:21 PM IST

ताज्या बातम्या