भारत-पाकमध्ये द्विपक्षीय चर्चा पुन्हा सुरू होणार

भारत-पाकमध्ये द्विपक्षीय चर्चा पुन्हा सुरू होणार

  • Share this:

swaraj_in_pak10 डिसेंबर : सीमेपार होणार्‍या घुसखोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेले काही महिने थंड बस्त्यात गेलेल्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या शांतता चर्चेला पुन्हा सुरुवात होतेय. दोन्ही देशांनी सर्वसमावेशक द्विपक्षीय चर्चा सुरू करायचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानच्या दौर्‍यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहाराबद्दलचे सल्लागार सरताज अझीज यांची भेट घेतली. त्यानंतर या निर्णयाची घोषणा करण्यात आली. नेहमीच्या सर्वसमावेशक चर्चेत येणार्‍या मुद्द्यांशिवाय इतरही काही मुद्दे चर्चेसाठी घेतले जातील, असं सरताझ अझीज यांनी स्पष्ट केलंय.

ही चर्चा प्रक्रिया सुरू करण्यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिव पातळीची बैठक लवकरच होणार आहे. नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून कोणत्याही मंत्र्यांचा हा पाकिस्तानचा पहिला दौरा आहे. सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचीही भेट घेतली. इस्लामाबादमध्ये हार्ट ऑफ एशिया कॉन्फरन्सदरम्यान ही भेट झाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी पाकिस्तानात होणार्‍या सार्क देशांच्या शिखर परिषदेसाठी जाणार आहेत, अशी माहिती सुषमा स्वराज यांनी दिली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: December 10, 2015, 8:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading