पत्रकार बालकृष्णन यांच्याकडून 'दिल्ली जायका'ची 4.28 कोटींना खरेदी

पत्रकार बालकृष्णन यांच्याकडून 'दिल्ली जायका'ची 4.28 कोटींना खरेदी

  • Share this:

delhi Jayka dawood

09 डिसेंबर : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तेची लिलाव सुरू झाला आहे. पत्रकार एस बालाकृष्णन यांनी दक्षिण मुंबईतील पाकमोडिया रस्त्यावरचे दाऊदचं हॉटेल 'दिल्ली जायका' 4 कोटी 28 लाख रूपयांची बोली लावून खरेदी केली आहे.

1993च्या बॉम्बस्फोटांनंतर सीबीआयनं 'दिल्ली जायका' हे रेस्टॉरंट जप्त केलं होतं. काही दिवसांपूर्वीहीच मालमत्ता खरेदी करण्याची बोली लावल्यामुळे पत्रकार एस.बाळकृष्णन यांना दाऊदचा साथीदार छोटा शकील याने धमकी दिली होती. या मालमत्तेची राखीव किंमत 1.18 कोटी रुपये आहे. तसंच दाऊदच्या गाडीसाठी 3.20 लाखांची बोली लावण्यात आली आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांच्याकडून ही बोली लावण्यात आली. दाऊदच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह गाडीचं दहन करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे. लिलावाची ही प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी हॉटेल डिप्लोमेटच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, संपत्ती दाऊदची असल्यामुळे फार कमी व्यक्तींनी त्यात रस दाखवल्याचं म्हटलं जातं. तसंच सरकारने ही मालमत्ता ताब्यात देण्याबाबत कोणतेही आश्वासन न दिल्याने बोली लावणार्‍या व्यक्तीने त्यातून माघार घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: December 9, 2015, 5:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading