News18 Lokmat

भारत-पाक सीरिज होणार, लवकरच घोषणा ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 8, 2015 05:29 PM IST

ind vs pak08 डिसेंबर : भारत पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे एका प्रकारचे युद्धचं...दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमीसाठी हा सामना जीवन मरणाचा प्रश्न बनतो. त्यामुळे पुन्हा एकदा हा थरार पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. कारण भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका होण्याची शक्यता आहे.

याबाबत आज रात्री किंवा उद्या बुधवारी सकाळी घोषणा होण्याची शक्यता आहे. आज परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तामध्ये जाणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा होण्याची शक्यता आहे. ही मालिका श्रीलंकेत होण्याची दाट शक्यता आहे.

या आधीही भारत-पाकिस्तान सीरिज डिसेंबरमध्ये होणार असं जवळपास निश्चित झालं होतं. भारत-पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सीरिज व्हावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. डिसेंबर महिन्यातही सीरिज व्हावी असं नियोजन आखलंही गेलं. 15 डिसेंबर ही तारीख निश्चित झाली होती.

या नियोजनानुसार, या सीरीजमध्ये दोन कसोटी, पाच वन-डे आणि दोन टी-ट्वेंटी सामन्यांऐवजी फक्त तीन वन-डे आणि दोन टी-ट्वेंटी सामनेच होतील अशीही चर्चा आहे. याबद्दलची घोषणाही झाली होती. पण,भारत पाकिस्तान सीरिज होणार नाही असं परराष्ट्रमंत्रालयाने स्पष्ट केलं होतं. भारत-पाक सामने व्हावे की नाही याचा अंतिम निर्णय हा केंद्र सरकारच्या हातात आहे. आता सुषमा स्वराज पाकिस्तानच्या दौर्‍यावर जाणार आहेत. त्यामुळे या भेटीचं फलीत म्हणून भारत-पाक सामन्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2015 05:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...