परमारांच्या डायरीत शिंदे-खडसेंचं नाव नाही, मुख्यमंत्र्यांकडून बचाव

परमारांच्या डायरीत शिंदे-खडसेंचं नाव नाही, मुख्यमंत्र्यांकडून बचाव

  • Share this:

cm on parmar06 डिसेंबर : बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजब आणि धक्कादायक खुलासा केलाय. सूरज परमार यांच्या डायरीमधील ES आणि EK ही एकनाथ शिंदे आणि एकनाथ खडसे यांची नाव नाही. विरोधकांनी पुराव्यानिशी आरोप करावे अशी पाठराखण मुख्यमंत्र्यांनी केली.

सूरज परमार यांच्या डायरीमध्ये 4 नगरसेवकांची नाव समोर आल्यानंतर 4 नगरसेवकांना आता जेलची हवा खावी लागली. या प्रकरणीतील आरोप नजीब मुल्ला यांच्या अकाऊंटमधून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यात एक कोटी ट्रान्सफर करण्यात आल्याची बाब सरकारी वकिलांनी उघड केल्यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर राष्ट्रवादीनेही पलटवार केला. परमार यांच्या डायरीत ES आणि EK ही नावंही आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या दोन्ही नावाचा उल्लेख करत मंत्रिमंडळातील सदस्यांवर आरोप केला होता. आणि या दोन्ही नावांचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी ही केली. या नावांच्या उल्लेखावरुन मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे आणि एकनाथ खडसे यांची ही नावं नाही. विरोधकांनी पुराव्यानिशी आरोप करावा. यात काहीही तथ्य नाही. मुळात ही डायरी दीड वर्ष जुनी आहे आणि तेव्हा खडसे आणि शिंदे मंत्री नव्हते असा बचावच मुख्यमंत्र्यांनी केला. अजूनही ES आणि EK याचा तपास लागलेला नसताना मुख्यमंत्र्यांनी या दोन विद्यमान मंत्र्यांचंी नावं घेऊन असा बचाव करण्याचं काय कारण होतं याचीच चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: December 6, 2015, 7:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading