...आणि सेहवागने टाळला धोणीचा उल्लेख

...आणि सेहवागने टाळला धोणीचा उल्लेख

  • Share this:

virendra_last speech03 डिसेंबर : भारताचा तडाखेबाज फलंदाज वीरू अर्थात वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय. आज वीरेंद्रला दिल्ली टेस्ट सुरू होण्याआधी सन्मानपूर्वक अखेरचा निरोप देण्यात आला. आपल्या भाषणात सेहवागने सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांसोबतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचेही आभार मानले. पण, महेंद्र सिंग धोनीसोबत 6 वर्षं खेळूनही सेहवागने त्याचं नाव घेणं मात्र टाळलं.

बीसीसीआयने भारत आणि दक्षिण अफ्रिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या टेस्टच्या सुरुवातीच्या आधी सेहवागला सन्मानित केलं. बोर्डाचे सचिव अनुराग ठाकुर यांनी सेहवागला त्याच्या आजवरील यशस्वी कामगिरीसाठी चषक भेट दिला. या प्रसंगी सेहवागसोबत त्याची आई, पत्नी आणि मुलगाही उपस्थित होता.

सेहवागने आपल्या निरोपाच्या भाषणात बीसीसीआय, डीडीसीए, त्याचे पहिले कोच ए.एन.शर्मा तसंच दिल्ली अंडर 19 संघात निवडणारे सतीश शर्मा यांचे आभार मानले. त्याने म्हटलं की, "मी माझ्या वडिलांचे सर्वात जास्त आभार मानू इच्छितो कारण त्यांच्या अनुमतीमुळेच मी खेळू शकलो."

तसंच आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातील टेस्टमध्ये झळकावलेलं पहिलं शतक हा संस्मरणीय क्षण होता असंही त्याने सांगितलं. परंतु आपल्या अलौकिक कारकिर्दीत दोन वेळा तिहेरी शतक जोडूनही 400 धावांपर्यंत न पोहोचण्याची खंत सेहवागने व्यक्त केली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: December 3, 2015, 3:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading