'आप'ला आली अण्णांची आठवण, 'लोकपाल'साठी कुमार विश्वास राळेगणमध्ये!

'आप'ला आली अण्णांची आठवण, 'लोकपाल'साठी कुमार विश्वास राळेगणमध्ये!

  • Share this:

anna vishwas

01 डिसेंबर : दिल्ली तख्तावर विराजमान झाल्यानंतर अखेर 'आप'ला अण्णा हजारेंची आठवण आलीये. लोकपाल विधेयकावरुन दिल्लीतील विधानसभेत आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. त्यासंदर्भात अण्णांचा सल्ला घेण्यासाठी कुमार विश्वास आणि संजय सिंह राळेगणसिद्धीला दाखल झाले आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही अण्णांशी दोनवेळा फोनवरुन संवाद साधलाय.

यावेळी अण्णांनी तीन मुद्द्यांवर दुरुस्त्या सुचवल्या आहेत. त्यात, सध्याच्या लोकपाल चुनाव समिती सदस्यांची संख्या पाच वरुन सात करण्याची मागणी अण्णांनी केलीय. सध्याच्या समितीमध्ये अजून एक न्यायाधीश आणि राजकारणात विरहीत व्यक्ती घेण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर लोकपाल हटवण्याच्या प्रक्रियेतही सुधारणा सुचवल्या आहेत. संबंधीतांची सुरुवातीला उच्च कडून चौकशी करावी आणि त्या अहवालानंतर विधानसभेत दोन तृतियांश बहुमतानं निर्णय घ्यावा, असं अण्णांनी म्हटलं आहे. तर चुकीच्या तक्रारी संदर्भात एक वर्षांचा कारावास किंवा एक लाख दंडाची सूचना अण्णांनी केली आहे. तर कुमार विश्वास यांनी अण्णांच्या सूचनाचा आम्ही स्विकार करुन दुरुस्ती करण्याचं आश्वासन दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: December 1, 2015, 2:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading