News18 Lokmat

देशप्रेम सिद्ध करण्याची गरज नाही, शाहरुखकडून आमिरची पाठराखण !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 1, 2015 12:28 PM IST

देशप्रेम सिद्ध करण्याची गरज नाही, शाहरुखकडून आमिरची पाठराखण !

srk on amir khan01 डिसेंबर : आपलं देशप्रेम सिद्ध करण्याची कुणालाही गरज नाही असं म्हणत बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान आमिर खानच्या मदतीला धावून आलाय.

शाहरुख खानने सीएनएन आयबीएनला दिलेल्या खास मुलाखतीत आमिरची जोरदार पाठराखण केली आहे. आमिरच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. तो व्हायला नको होतो असं परखड मत शाहरुखने व्यक्त केलंय. तसंच सोशल मीडियावरुन त्याविरोधात जो गदारोळ झाला त्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे, असंही शाहरुखनं म्हटलंय. रामनाथ गोयंका पुरस्कार सोहळ्यात आमिर खानने आपल्या कुटुंबाला देशात भीती वाटते. आपली पत्नी किरणने देश सोडण्याचं सुचवलं होतं असं वक्तव्य केलं होतं. आमिर च्या वक्तव्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आमिरवर एकच टीकास्त्र सोडले होते. विशेष म्हणजे, या आधी शाहरुखने असहिष्णुतेच्या मुद्यावर भाष्य केल्यामुळे त्याला टीकेचा धनी व्हावं लागलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2015 12:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...