दादागिरी धुडकावली; माय नेम इज रिलीज

दादागिरी धुडकावली; माय नेम इज रिलीज

12 फेब्रुवारीअखेर शिवसेनेच्या आंदोलनाला धूप न घालता माय नेम इज खान हा सिनेमा रिलीज झाला आहे. मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्येही हा सिनेमा रिलीज झाला. आणि सिनेमा रिलीज होताच शिवसैनिकांनी ठिकठिकाणी राडा करण्यासही सुरुवात केली. गर्दी आणि गोंधळ अंधेरीतील 'फन रिपब्लिक'मध्ये शिवसैनिकांनी दगडफेकीचा प्रयत्न केला. तो पोलिसांनी लगेच हाणून पाडला. चेंबूरमध्येही फन थिएटरमध्ये शिवसैनिकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.मुंबईतील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये सिनेमा रिलीज झाला. परळमधल्या प्रिमियर थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चांगली गर्दी केली. काही सिनेकलाकारांनीही या सिनेमाला हजेरी लावलीय. मुंबईत कबीर बेदी आणि पूजा बेदीने या सिनेमाला पहिल्यांदा हजेरी लावली.नागपूरमध्ये 'माय नेम इज' पाहायला लोकांनी केली गर्दी केली. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये शाहरुखचे पोस्टर फाडत असताना शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुमारे 20 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्याबाहेर पडसादसिनेमा रिलीजला विरोध करणार्‍या 11 शिवसैनिकांना गोवा पोलिसांनी अटक केली. दिल्लीतही या वादाचे पडसाद उमटले. दिल्लीतील दर्यागंज भागातील डिलाईट सिनेमासमोर सकाळीच शाहरूख खानचे फॅन्स जमले आणि त्यांनी शिवसेना विरोधात नारेबाजी केली. तसेच शिवसेना नेत्यांचे पोस्टर्स फाडले. शाहरूख खान मूळ दिल्लीचा असल्याने आम्ही त्याच्या समर्थनासाठी आंदोलन करत आहोत, असे त्याच्या समर्थकांचे म्हणणे आहे. गृहमंत्र्यांचे आवाहनदरम्यान आम्ही या सिनेमाला संपूर्ण सुरक्षा दिलेली आहे. प्रेक्षकांनी न घाबरता सिनेमा बघायला जावे, असे आवाहन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2010 09:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading