कशी आहे भावना गवळींची लोकसभेतील कामगिरी ?

कशी आहे भावना गवळींची लोकसभेतील कामगिरी ?

  • Share this:

कौस्तुभ फलटणकर, नवी दिल्ली

30 नोव्हेंबर : वाशिममधून चार वेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या एकमेव महिला खासदार भावना गवळी...केंद्रात मंत्री होण्याची त्यांची अपेक्षा होती, पण सेना नेतृत्त्वाकडून त्यांची दखल न घेतल्यामुळे दुखवलेल्या भावना गवळी यांची लोकसभेतील कामगिरी फारशी चमकदार नाहीय.

bhavana gavali4केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळींचा लोकसभेत काम करण्याचा उत्साह मावळला की काय ?,असा प्रश्न त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीला बघून येतो, लोकसभेत प्रश्न उत्तरे असो की चर्चा, भावना गवळींची चमक यावेळी फिक्की पडलेली दिसतेय.

41 वर्षांच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी कधी देशातल्या सगळ्यात युवा आणि ऊर्जावान खासदार होत्या. पण लोकसभेची चौथी टर्म येता येता भावना गवळींची सभागृहातील कामगिरी अतिशय साधारण दिसतेय.

- भावना गवळी यांची लोकसभेत उपस्थिती 78 टक्के

- लोकसभेच्या सगळ्या खासदारांच्या उपस्थितीचा एव्हरेज आहे 84 टक्के तर महाराष्ट्रातल्या उर्वरीत खासदारांचा एव्हरेज आहे 81 टक्के.

चर्चेतील सहभाग

भावना गवळी यांनी आत्तापर्यंत फक्त तेरा चर्चेत सहभाग घेतला, ज्यात सगळ्या खासदारांच्या एव्हरेज 20 टक्के आणि महाराष्ट्रातल्या खासदारांच्या एकूण 19 टक्के पेक्षा सुद्धा कमी आहे.

जनतेचे प्रश्न

भावना गवळी यांनी 65 प्रश्न विचारले आहेत, लोकसभेतला इतर खासदारांचा एव्हरेज 89 आहे तर महाराष्ट्राचा 189

 

भावना गवळी यांनी केलेल्या चर्चेत

कापसाला 7000 रुपये क्विंटल हमी भाव, आणि यवतमाळकरांची जिव्हाळ्याची शकुंतला एक्स्प्रेस बंद होण्यापासून थांबवण्याची मागणी महत्वाची होती.

भावना गवळी चं रिपोर्ट कार्ड बघून त्यांना येत्या काळात आणखी मेहनत घ्यावी लागणार असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2015 05:03 PM IST

ताज्या बातम्या