डान्स बार बंदीसाठी कायदेशीर मार्गांचा आधार घेऊ -मुख्यमंत्री

  • Share this:

345508-devendra-fadnavis-farmer26 नोव्हेंबर : डान्सबार वरची बंदी उठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलेला आहे. डान्सबारसाठी लायसन्स द्या असे निर्देशही कोर्टाने सरकारला दिलेले आहेत. यानंतर डान्सबारशी संबंधित लोकांनी आनंदोत्सव करायला सुरुवात केली होती, पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आपण आदर करतो, पण आपलं सरकार डान्सबारच्या विरोधात असून डान्सबार सुरू होऊ नयेत यासाठी सर्व कायदेशीर आणि संवैधानिक मार्गांचा आधार घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

याआधीही सुप्रीम कोर्टाने डान्सबारवर बंदी उठवण्याचा निर्णय दिला होता. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी डान्सबारला विरोध असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच कायदेशीर बाबी तपासून पाहुन डान्सबारला बंदी कशी ठेवता येईल यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: November 26, 2015, 5:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading