अखेर भारत-पाक सीरिज होणार, श्रीलंकेत भिडणार !

अखेर भारत-पाक सीरिज होणार, श्रीलंकेत भिडणार !

  • Share this:

india vs pak match26 नोव्हेंबर : अखेर भारत-पाकिस्तान सीरिज डिसेंबरमध्ये होणार आहे. दोन्ही देशाच्या सरकारनी या क्रिकेट सीरिजला मान्यता दिली आहे. डिसेंबर महिन्यात श्रीलंकेमध्ये ही सीरिज होईल. त्यामुळे यंदा लंकेच्या भूमीतून भारत-पाक सामन्याचा थरार पाहण्यास मिळणार आहे.

भारत-पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सीरिज व्हावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण अखेर त्यातले सर्व अडथळे दूर झालेत.डिसेंबर महिन्यातही सीरिज होईल. 15 डिसेंबरपासून भारत-पाक सीरिज होणार आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. आधी ठरल्याप्रमाणे, या सीरीजमध्ये दोन कसोटी, पाच वन-डे आणि दोन टी-ट्वेंटी सामन्यांऐवजी फक्त तीन वन-डे आणि दोन टी-ट्वेंटी सामनेच होतील अशीही चर्चा आहे. आर.प्रेमदासा आणि कँडी येथील स्टेडिअम अशा दोन ठिकाणी ही मालिका होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: November 26, 2015, 4:14 PM IST

ताज्या बातम्या