मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याला सात वर्षं पूर्ण

  • Share this:

26 11 attack_new york26 नोव्हेंबर : आज आहे 26 नोव्हेंबर...सात वर्षांपूर्वी मुंबईवर झाला होता भीषण दहशतवादी हल्ला..अतिरेक्यांनी मुंबईतल्या हॉटेल ताज आणि ट्रायडेन्ट आणि नरिमन हाऊसला लक्ष्य केलं.

देशाची आर्थिक राजधानी अवघ्या 10 अतिरेक्यांनी सलग 60 तास वेठीस धरली होती. अतिरेकी एके 47 सारखी अत्याधुनिक शस्त्रास्रे , हँड ग्रेनेड, सॅटेलाईट फोन्स अशी तयारी करुनच आले होते. 26 नोव्हेंबरची रात्र ते 29 नोव्हेंबर हा सर्व थरार सुरू होता. मुंबई पोलिसांनी एनएसजी कमांडोजच्या साहाय्यानं या अतिरेक्यांना संपवलं.

एकमेव अजमल कसाब हा जिवंत अतिरेकी भारताच्या ताब्यात आला. त्याला त्यानंतर फाशी देण्यात आली, या सगळ्या हल्ल्यांमध्ये 164 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 308 जण जखमी झाले. मुंबई पोलिसांकडे असलेली कालबाह्य शस्त्रं, सागरी सुरेक्षेचे तीनतेरा या विषयांवर गेल्या सात वर्षांपासून चर्चा होते आहे पण ठोस अंमलबजावणी मात्र नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2015 01:33 PM IST

ताज्या बातम्या