पाणीप्रश्न 20 वर्षे भिजत

11 फेब्रुवारीमनमाडचा पाणीप्रश्न गेल्या 20 वर्षांपासून भिजत पडला आहे. इथे अजूनही 8 दिवसांतून एकदाच आणि तेही एकच तास पाणी येते. या पाणीप्रश्नाविरुद्ध मनमाडकरांनी अनेक वेळा आंदोलने केली. पण काहीही उपयोग झालेला नाही.अनेकदा 12 दिवसांनंतर पाणी येते...त्या दिवशी इतर कामे करता येत नाहीत...उन्हाळ्यात तर काय हाल होतील याची कल्पनाच करवत नाही... पाइपलाइन्स खूपच खाली असल्याने खड्डे खणून गढूळ पाणी भरावे लागते... इतके दिवस पाणी साठवून ठेवावे लागल्याने त्यात किडेही पडतात...अशा असंख्य अडचणी येथील महिला सांगत आहेत. तर लवकरच नवी टाकीचे काम सुरू होणार आहे. स्वत: छगन भुजबळ यात लक्ष घालणार आहेत, असे आश्वासन मनमाडचे नगराध्यक्ष गणेश धात्रक देत आहेत. पण मनमाडकरांना पाण्यासाठी किती दिवस वणवण करावी लागेल याचे उत्तर मात्र प्रशासन देत नाही.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2010 09:15 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2010 09:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...