'माय नेम इज खान'

'माय नेम इज खान'

11 फेब्रुवारीशाहरूख खाननंतर आता आज मुख्यमंत्र्याना 'सामना'तून टार्गेट करण्यात आले आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जहरी टीका करण्यात आली आहे. 'माय नेम इज अशोक खान' नावाच्या अग्रलेखात चव्हाण ज्या खानची पाठराखण करताहेत तो खानच त्यांच्या पतनाला कारणीभूत ठरेल, असे 'भविष्य'ही वर्तवण्यात आले आहे. त्याचसोबत अशोक चव्हाणांकडे अपघातानेच मुख्यमंत्रीपद आल्याची टीकाही यात करण्यात आली आहे. 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी मुख्यमंत्री पद मिळाल्याने खान प्रेमाची तळी उचलून अशोकराव पाकिस्तानचे राष्ट्रीय हिरो ठरल्याचे या अग्रलेखात म्हटले आहे. शाहरुखला बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा आहे. पण सरकारच त्यात खोडा घालत असल्याचा आरोपही 'सामना'त करण्यात आला आहे'रोजीरोटी चालावी म्हणून...''माय नेम इज खान'च्या विरोधातील शिवसेनेचे आंदोलन हे 'मातोश्री'ची 'रोजीरोटी' चालावी म्हणून केले जात आहे,असा आरोप नारायण राणेंनी केला आहे. कोणताच मुद्दा शिल्लक नसल्याने शिवसेना अशा प्रकारचे आंदोलन करत असल्याचे राणे म्हणाले आहेत. शिवसेनेचा 'मराठी'चा मुद्दा मनसेने नेला आहे. त्यामुळे सेनेकडे कुठलाच मुद्दा राहिला नाही. त्यामुळे ते आता राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करत आहेत असा टोलाही राणेंनी ठाणे इथे बोलताना लगावला.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 11, 2010 08:42 AM IST

ताज्या बातम्या