गणवेश आणि पुस्तकं विकत घ्यायला पैसे नाहीत म्हणून शेतकरीपुत्राची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Nov 23, 2015 07:04 PM IST

गणवेश आणि पुस्तकं विकत घ्यायला पैसे नाहीत म्हणून शेतकरीपुत्राची आत्महत्या

23 नोव्हेंबर : गेल्या काही वर्षांपासून शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा राज्यासमोरचा सर्वात गंभीर प्रश्न बनलाय. नापिकी, अवकाळी पाऊस, कर्जबाजारीपणा ही शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्याची मुख्य कारणं...पण आता शेतकर्‍यांची मुलंही आत्महत्या करू लागली आहे. हे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय अकोला जिल्ह्यात. गणवेश आणि पुस्तकं विकत घ्यायला पैसे नाहीत, म्हणून विशाल खुळे या 9 वीत शिकणार्‍या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात दधम गावात ही घटना घडली.

विशाल हा महाराणा प्रताप शाळेत शिकत होता. फी भरायला पैसे नाहीत, बसच्या पाससाठी पैसे नाहीत, अशा किरकोळ वाटणार्‍या समस्या या मुलांसाठी जीवन-मरणाचा प्रश्न होऊन बसतात आणि या समस्यांवर उत्तर मिळत नाही असं वाटल्यानं ही मुलं आत्महत्या करतात असं दिसून येतंय. राज्यात बळीराजाच्या घरातली परिस्थिती किती भयानक झाली आहे याचं हे अस्वस्थ करणारं हे चित्र आहे. या अगोदरही लातूरमध्ये बसच्या पाससाठी पैसे नाहीत म्हणून एका विद्याथीर्ंनीने आत्महत्या केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2015 07:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close