राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा ?

  • Share this:

rain in maharashtra 33423 नोव्हेंबर : ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर घातलीये. राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.

रायगड, नाशिक आणि बीड या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तर औरंगाबादमध्ये रात्री तुरळक सरी पडल्या. बीड जिल्ह्यात नेकनुर, गेवराई, आष्टीत रिमझिम पावसाने हजेरी लावली. काल पुणे शहरात संध्याकाळनंतर आणि रात्रभर संततधार पावसाने झोडपलं. सोसायटीच्या पार्किंगमध्ये आणि काही घरांमध्येही हे पाणी घुसलं. त्याचा अर्थातच नागरिकांना त्रास झाला. नाले बुजवल्याचा आणि ड्रेनेज तुंबल्याचा फटका त्यांना बसलाय.

आज सकाळीही संततधार असणार्‍या पावसाने काहीशी विश्रांती घेतलीय. जोरदार पाऊस झाल्यानं अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दिसतंय. काही घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलंय. वादळी वार्‍यामुळे अनेक झाडं उखडून पडली. शहरातील सिंहगड रस्ता, कात्रज, पुणे- सातारा रस्ता, कोथरूड, औंध, खडकी, आंबेगाव, धायरी, वारजे, डेक्कन, शिवाजीनगर, येरवडा, सांगवी, पिंपळे सौदागर, कासारवाडीतही रात्रभर पाऊस पडत होता.

राज्यात या ठिकाणी ढगाळ वातावरण

- रायगड

- नाशिक

- बीड

- औरंगाबाद

- जळगाव

- उस्मानाबाद

- परभणी

- नाशिक

अवकाळी पावसामुळे काही पिकांना फायदा तर काही पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. एक नजर टाकूया कोणत्या पिकांना फायदा होणारा आणि कोणत्या पिकांना फटका बसेल

पिकांना फायदा

- रब्बी पिकांना लाभदायक

- रब्बी ज्वारी, हरभरा, कांदा,

ऊस, भाजीपाला

- खरीप पिकातली तूर

या पिकांना फटका

- द्राक्ष पिकाला मोठा फटका

- द्राक्षाच्या निर्यातीवर परिणाम

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2015 05:49 PM IST

ताज्या बातम्या