महेश मोतेवारांवर फौजदारी कारवाई व्हावी - किरीट सोमय्या

  • Share this:

kirit somaiywewbae19 नोव्हेंबर : लाखो गुंतवणूकदारांना गंडा घालणार्‍या 'समृद्ध जीवन'ने सेबीचे प्रतिबंध असतानाही या कंपनीनं तब्बल 426 कोटींचे व्यवहार करुन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. तसंच मोतेवार यांनी गुंतवणुकदारांचे सगळे पैसे बुडवले असून सरकारनं त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

समृद्धजीवन मल्टी को-ऑ सोसायटीने चीट फंडच्या माध्यमातून जमा केलेले 426 कोटी रुपये मॉल, इतर बिझनेस आणि टिव्ही चॅनेलमधे सेबीच्या निर्बधानंतरही वापरले आहेत आणि ते लोकांना परत केले जाण्याची शक्यता शुन्य आहे असा खळबळजनक आरोप ही किरीट सोमय्यांनी केला आहे. यासाठी सोमय्या यांनी कॉपरेटिव्ह मिनीस्ट्रीच्या 2015 चा रिपोर्टचा दाखला दिला आहे.

आघाडी सरकारनं वेळीच कारवाई केली असती तर हे प्रकरण एवढं वाढलंच नसतं असंही सोमय्या म्हणाले. त्यामुळे याप्रकरणी महेश मोतेवार यांच्यावर फौजदारी कारवाई करुन त्यांची आणि संचालकांची बँक खाती जप्त करण्यात यावीत अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. यासंदर्भात ते कृषीमंत्री राधामोहन सिंग आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांनी भेटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2015 03:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...