पॅरिसमध्ये गोळीबार : 7 दहशतवाद्यांना अटक, तर 3 जणांना कंठस्नान

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Nov 18, 2015 08:50 PM IST

पॅरिसमध्ये गोळीबार : 7 दहशतवाद्यांना अटक, तर 3 जणांना कंठस्नान

Ë×ÖêêËÖêêy

18 नोव्हेंबर : फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये पोलिसांवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. पॅरिसच्या उत्तरी भागातील सेंट डेनिसमध्ये पोलिसांच्या शोधमोहीमेदरम्यान संशयित दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं असून सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मृतांमध्ये महिलेचा समावेश आहे आणि तिने स्फोट घडवत स्वत:ला उडवल्याचं सांगण्यात येत आहे. तर हल्ल्यात तीन पोलीसही जखमी झालेत. यामध्ये एका नागरिकाचाही जागीच मृत्यू झाला. चकमकीदरम्यान सात छोटे स्फोट झाले.

उत्तर पॅरिसमधील सेंड डेनिस इथल्या एका इमारतीमध्ये दोन ते तीन संशयित दहशतवादी दडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली. स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी इमारतीत दडलेल्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. संशयितांमध्ये पॅरिसमधील हल्ल्यांचा मास्टरमाईंड अब्दलहमीद अबाऊद असण्याची शक्यता आहे. अब्दलहमीद पोलिसांच्या मुख्य निशाण्यावर आहे. या कारवाईमध्ये तीन पोलीसही जखमी झाले असून पोलिसांनी स्थानिक नागरिकांना कोणत्याही स्थितीत घराबाहेर न पडण्याची सूचना केली आहे.

गेल्याच आठवड्यात पॅरिसमधील रेस्टॉरंट, कॉन्सर्ट हॉल, नॅशनल स्टेडियम येथे सात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबार आणि बॉम्बस्फोटात 130 लोकांना आपला जीव गमावावा लागला होता. आयसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यांनतर फ्रान्स सरकारने सीरियातील आयसिसच्या तळांवर हवाई हल्ले सुरू केले. आजही फ्रान्सकडून आयसिसच्या तळांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2015 07:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...