जप्त केलेली तूरडाळ नगरसेवकांनी स्वस्तात विकली, काँग्रेसचा आरोप

जप्त केलेली तूरडाळ नगरसेवकांनी स्वस्तात विकली, काँग्रेसचा आरोप

  • Share this:

sdasdasay

17 नोव्हेंबर : तूरडाळीचा साठा केलेल्या कंपन्यांवर छापा टाकून जप्त केलेली डाळ स्वस्तात घेऊन भाजपच्या नगरसेवकांनी तिची चढ्या दराने विक्री केल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. याप्रकरणी पालकमंत्री आणि भाजपच्या डाळ विक्री केंद्रांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तर दुसरीकडे, शिंदे यांचे आरोप भाजपचे नगरसेवक अशोक येनपुरे यांनी फेटाळून लावले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी खालापूर इथल्या तूरडाळीच्या गोदामावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात तूरडाळ जप्त केली. दिवाळीत 100 रुपये किलो दराने डाळ देण्यासाठी 'ईटीसी' कंपनीकडून बापट यांनी येनपुरे यांच्या नावावर डाळीची खरेदी केली आहे. ही डाळ 97 रुपयांनी खरेदी केली असतानाही शहरात 100 रुपये किलो दराने तिची विक्री केली आहे. त्यातही बापट यांच्याच मतदारसंघात विक्री झाली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेऐवजी भाजपच्या नगरसेवकांमार्फत डाळीची विक्री का केली, असा प्रश्न शिंदे यांनी विचारला आहे. ही सरळ-सरळ चोरी असून जप्त केलेली तूरडाळ विकण्याचा अधिकार नगरसेवकांना कुणी दिला, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: November 17, 2015, 2:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading