'आयसिस'ला संपविणारच; फ्रान्स राष्ट्राध्यक्षांचा निर्धार

'आयसिस'ला संपविणारच; फ्रान्स राष्ट्राध्यक्षांचा निर्धार

  • Share this:

s.alambaigi20130516170224170

17 नोव्हेंबर : पॅरिस हल्ल्याने हादरलेल्या फ्रान्सने आयसिसविरोधातील कारवाई आणखी तीव्र केली असून, आयसिसला संपवून टाकण्याचा निर्धार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद यांनी केला आहे.

होलांद यांनी सोमवारी आयसिसविरोधात युद्ध पुकारलं असून, आयसिसच्या सीरियातील तळांवर फ्रान्सच्या हवाई दलाकडून हवाई हल्ले करण्यात आले. सीरिया ही दहशतवाद्यांचा कारखाना बनला असून, सीरियाच्या प्रश्नावर जागतिक पातळीवर एकमत होण्याची गरज असल्याचे सांगत इसिसला संपविण्यासाठी फ्रान्स कटीबद्ध असल्याचे होलांद यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात फ्रान्स आणि आयसिस यांच्यातील युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: November 17, 2015, 2:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading