बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्यातच - मुख्यमंत्र्यांची घोषणा

बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्यातच - मुख्यमंत्र्यांची घोषणा

  • Share this:

CM on smarak

17 नोव्हेंबर : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अखेर जागा मिळाली असून दादरमधल्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक होईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आमच्या कार्यकाळात या स्मारकाचं पूर्ण होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचं मुंबईत स्मारक व्हावं अशी जनतेची इच्छा होती. गेल्या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या व्दितीय स्मृतीदिनी राज्य सरकारने स्मारकासाठी उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीने मुंबई आणि परिसरातील आठ जागांची पाहणी केली. आज बाळासाहेबांच्या तृतीय स्मृतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत स्मारकाबाबत घोषणा केली.

महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक तयार केलं जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं. स्मारकाच्या कामात निधीचा प्रश्न येणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. तसंच स्मारकासाठी पब्लिक ट्रस्टची निर्मिती केली जाईल. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे असतील आणि त्यांच्या देखरेखीखाली स्मारकाचं काम केलं जाईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सर्व नियमांचं पालन करुन स्मारक उभारणार आणि त्यासाठी जे काही लागेल ते सगळं करणार, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. महापौरांना यापूर्वीच्या बंगला उपलब्ध करून दिला जाईल, जो अधिक प्रशस्त असेल असंही फडणवीस यांनी नमूद केलं आहे.

दरम्यान, स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे आभार मानले. जागा कुठचीच वाईट नसते. महापौर बंगल्याचा शिवसेनेवर आशिर्वाद होता, तर शिवाजी पार्क ही शिवसेनेची कर्मभूमी आहे. त्यामुळे महापौर बंगल्याच्या जागेला विशेष महत्त्व आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्याचबरोबर, महापौर बंगल्याला धक्का लावला जाणार नाही सर्वांना अभिमान वाटेल असं स्मारक करू असंही ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2015 02:01 PM IST

ताज्या बातम्या