पॅरिसप्रमाणे अमेरिकेतील वॉशिंग्टनवर हल्ले करू- आयसिसची धमकी

पॅरिसप्रमाणे अमेरिकेतील वॉशिंग्टनवर हल्ले करू- आयसिसची धमकी

  • Share this:

is_image

16 नोव्हेंबर : पॅरिसमध्ये ज्याप्रमाणे हल्ले केले, त्याचप्रमाणे आता अमेरिकेतील वॉशिंग्टनवर हल्ले करू, अशी धमकी 'आयसिस' या दहशतवादी संघटनेनं एका व्हिडिओद्वारे दिली आहे. व्हिडिओद्वारे देणार्‍या 'आयसिस' या दहशतवादी संघटनेनं आता थेट महासत्ता असलेल्या अमेरिकेसह सिरियावर हवाई हल्ले चढवणार्‍या देशांना धमकावणारा आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

शुक्रवारी आयसिसच्या दहशतवाद्यांनी पॅरिसमध्ये सहा ठिकाणी दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात 132 जणांचा मृत्यू झाला होता तर सुमारे 350 जण जखमी झालेत. आतापर्यंत काहीशी नरमाईची भूमिका घेणार्‍या फ्रान्सने आता मात्र कठोर पावलं उचलत आयसिसविरोधात युद्धच पुकारलं आहे. पॅरिस हल्ल्यानंतर फ्रान्सनं सिरियातील आयसिसच्या तळांवर जोरदार हल्ले चढवले. रविवारी रात्री फ्रान्सनं अमेरिकेच्या मदतीनं सिरियातील रक्का शहरावर 20 हून अधिक बॉम्ब टाकले. तर दुसरीकडे अमेरिकेच्या सैन्यानंही शेकडो तेलाचे ट्रक उडवून दिले. या हल्ल्यानंतर लगेच आयसिसनं नव्याने व्हिडिओ प्रसिद्ध करून वॉशिंग्टनवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे.

सिरियावर हवाई हल्ले करणार्‍या देशांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. फ्रान्समध्ये ज्याप्रमाणे हल्ले केले, त्याचप्रमाणे आता अमेरिकेतील वॉशिंग्टनवर हल्ले करू, अशी धमकी एका व्हिडिओद्वारे देण्यात आली आहे. हा व्हिडिओ आयसिसने प्रसिद्ध केल्याचं अद्याप स्पष्ट झालेले नाही, असं सूत्रांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: November 16, 2015, 9:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading