पॅरिसपाठोपाठ तुर्कीतही दहशतवादी हल्ला, 4 पोलीस जखमी

पॅरिसपाठोपाठ तुर्कीतही दहशतवादी हल्ला, 4 पोलीस जखमी

  • Share this:

sadasdaspy

15 नोव्हेंबर : पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्याला 24 तास उलटत नाहीत तोवर तुर्कीमध्ये दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला आहे. या हल्ल्यात 4 पोलीस जखमी झाले आहेत. तुर्कीमध्ये आजपासून जी - 20 परिषद सुरू होत असून या परिषदेसाठी बराक ओबामा, नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील प्रमुख नेते सध्या तुर्कीत आहे. हल्ल्यानंतर जी -20 परिषदेसाठी तुकच्त आलेल्या जगभरातील नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

जी- 20 देशांच्या बैठकीत जगातील प्रमुख विकसित देशांमध्ये अमेरिका (युनायटेड स्टेट्स), ब्रिटन, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, जपान आणि ऑस्ट्रेलिया तर उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये चीन, कॅनडा, भारत, ब्राझील, रशिया, अर्जेंटिना, इंडोनेशिया, इटली, दक्षिण कोरिया, मेक्सिको, सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान हे देश सहभाग घेणार आहे. या बैठकीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुर्कीत पोहचले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: November 15, 2015, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading