केंद्राचं दुष्काळी पथक पुन्हा मराठवाड्याचा दुष्काळदौरा

केंद्राचं दुष्काळी पथक पुन्हा मराठवाड्याचा दुष्काळदौरा

  • Share this:

adsasdasay

15 नोव्हेंबर : दुष्काळाने होरपळणार्‍या मराठवाडयातील शेतकर्‍यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक बुधवारपासून मराठवाडय़ाच्या पाहणी दौर्‍यावर येत आहे.

केंद्रीय पथकाचा हा चार दिवसांचा दौरा आहे. यामध्ये पथकातील अधिकारी दुष्काळी भागाची पाहणी करून शेतकर्‍यांसोबत सवांद साधणार आहेत. त्याचबरोबर दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सरकारी मदतीकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.

केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकाच्या दौर्‍यानंतर केंदाकडून दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर होणार का, याकडे संपूर्ण मराठवाडयाचे डोळे लागले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: November 15, 2015, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading