पॅरिस हल्ल्यातील संशयितापैकी एकाची ओळख पटली

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2015 04:39 PM IST

पॅरिस हल्ल्यातील संशयितापैकी एकाची ओळख पटली

POLICE Paris 130600

15 नोव्हेंबर : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी बेल्जियममधून तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मायकल यांनी ही माहिती दिली.

फ्रान्स पोलिसांच्या तपासात संशयित असलेली काही वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसंच काही जणांनाही अटक करण्यात आली आहे, असं पंतप्रधान मायकल म्हणाले. अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी एकाची ओळख पटली असून, त्याचे नाव ओमर इस्माइल मोस्तेफाइ असं आहे. तर दुसरीकडे पॅरिस हल्ल्यानंतरच्या तपासात एका हल्लाखोराजवळ सीरियाचा पासपोर्ट मिळाला आहे. त्यामुळे या हल्लाखोरांचा संबंध सीरियातील दहशतवादी संघटना 'आयसिस'च्या लोकांशी असल्याचं बोलं जाते आहे. मात्र अजून याबाबत कोणत्याही अधिकार्‍यांनी पुष्टी दिलेली नाही. हे हल्लेखोर बेल्जियमच्या मार्गाने पॅरिसमध्ये घुसल्याचा संशय आहे.

पॅरिस हल्ल्याचे मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याशी साम्य असून या हल्ल्यात जखमी झालेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पॅरिसमध्ये सात ठिकाणी 'आयसिस'च्या अतिरेक्यांनी शुक्रवारी रात्री भीषण आत्मघातकी हल्ले चढवत केलेल्या गोळीबार आणि बॉम्बहल्ल्यांत 128 जण मृत्युमुखी पडले असून सुमारे 300 नागरिक जखमी झाले आहेत. जखमींमधील 80 जणांची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृत्यूमुखींच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा हल्ला म्हणजे फ्रान्सविरुद्धचे युद्धच असून कोणतीही दयामाया न दाखवता चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशी घोषणा फ्रान्सने केली आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2015 11:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...