...अन् सचिन तेंडुलकर 'ब्रिटीश एअरवेज'वर भडकला!

...अन् सचिन तेंडुलकर 'ब्रिटीश एअरवेज'वर भडकला!

  • Share this:

Sachin Twitte

13 नोव्हेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ब्रिटीश एअरवेजच्या कारभारावर चांगलाच भडकलाअसून ट्विटरच्या माध्यमातून त्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या ऑल स्टार्स सिरीजच्या दरम्यान सचिनच्या कुटुंबीयांना सीट उपलब्द करुन दिल्या नसल्यानं सचिन नाराज झाला आहे.

विमानात जागा उपलब्ध असूनही कुटुंबियांची तिकीट कन्फर्म न झाल्याचे सांगत सचिनने #BAdserviceBA या टॅगद्वारे ब्रिटीश एअरवेजच्या प्रशासनावर निशाणा साधला. तर ब्रिटीश एअरवेजकडून प्रवाशांना मिळणार्‍या वागणुकीवरही सचिनने संताप व्यक्त केला. सामानाच्या बाबत निश्काळजीपणा दाखवत सामान दुसर्‍याच पत्त्यावर पाठवण्यात आलं. याबाबत कोणतीच काळजी घेतली जात नाही, असंही सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सचिनच्या या ट्विटनंतर ब्रिटीश एअरवेजनं याची दखल घेतली असूनघडल्या प्रकाराबद्दल त्यांनी सचिनची माफी मागितली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: November 13, 2015, 1:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading