अशीही 'त्यांची' दिवाळी, मुखवट्याआड लुटला दिवाळीचा आनंद !

अशीही 'त्यांची' दिवाळी, मुखवट्याआड लुटला दिवाळीचा आनंद !

  • Share this:

Diwali_Fireworksकपिल भास्कर, नाशिक

12 नोव्हेंबर : प्रत्येक मुखवट्याच्या मागे एक निरागस चेहरा आपल्याला जडलेल्या आजराच्या पलीकडे जाऊन दिवाळीचा आनंद घेताना दिसत होता. ही दिवाळी होती एचआयव्ही बाधित चिमुकल्याची. नाशिकच्या यश फाउंडेशनने आयोजित केलेल्या दिवाळीच्या कार्यक्रमात या मुलांनी मनसोक्त आनंद

लुटला.

या मुलांना जडलेल्या आजाराला समाजाच्या मानसिकतेने स्वीकारले नसल्याने या चिमुकल्याना मुखवटे घालून दिवाळी साजरी करावी लागते हे जरी आपल्या देशाचे दुदैर्व असलं तरी..या मुलांचा आनंद या मुखवट्यात सुधा लपून राहिला नाही. मस्ती, मजा करात फटाके फोडून या मुलांनी मनसोक्त दिवाळीचा आनंद लुटाला.

यश फाउंडेशन आणि महिंद्रा कंपनीने या एचआयव्ही बाधित मुलांसाठी गेल्या आठ वर्षांपासून कार्य करते. तसंच दरवर्षी दिवाळी सेलिब्रेशन या कार्यक्रमाचे आयोजन करते. या मुलांमधील बहुतेक चिमुकल्याना आपण मुखवटे घालून दिवाळी का साजरी करतो हे जरी कळत नसले तरी. ज्या दिवशी समाजापासून या मुलांना आपली ओळख लपवावी लागणार त्या दिवशी खर्‍या अर्थाने दिवाळी साजरी झाली असेच म्हणावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2015 04:55 PM IST

ताज्या बातम्या