काँग्रेस पवारांवर नाराज

काँग्रेस पवारांवर नाराज

5 फेब्रुवारी'मातोश्री'वर जाऊन ठाकरेंची भेट घेतल्यामुळे अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्ष नाराज झाला आहे. पवारांनी बाळासाहेबांना भेटण्याआधी विचार करायला हवा होता, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. राजकारण आणि क्रिकेटचा संबंध नाही. आयपीएलच्या खेळाडूंना संरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने दिल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. औरंगाबादमध्ये पक्षाच्या अधिवेशनात ठाकरेंची जोरदार खिल्ली उडवून पवार लगेचच संध्याकाळी 'मातोश्री'वर हजर झाले होत. तिथे तब्बल 2 तास रंगलेल्या चर्चेत आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंना खेळू देण्याबाबत चर्चा झाली. त्यावर शिवसेना 2 दिवसांनी निर्णय घेईल, असेही मीडियाला सांगण्यात आली. पण ही पवार-ठाकरे भेट म्हणजे राहुल यांच्या मुंबई भेटीचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच वाढत्या महागाईवरून पवारांवर होणार्‍या टीकेचा रोख दुसरीकडे वळवण्यासाठी केलेली खेळी असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2010 12:34 PM IST

ताज्या बातम्या