S M L

अभिनेता शाहरुख खानची ईडीकडून 3 तास चौकशी

Samruddha Bhambure | Updated On: Nov 11, 2015 04:54 PM IST

अभिनेता शाहरुख खानची ईडीकडून 3 तास चौकशी

11 नोव्हेंबर : आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या खरेदीप्रक्रियेत परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने शाहरुख खानची 3 तास कसून चौकशी केली. चौकशीत शाहरुखने कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालेलं नाही, असा दावा केला आहे.

आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे मालकी अधिकार शाहरुखच्या रेड चिलीजकडे आहे. यात जुही चावलाचा पती जय मेहता यांचीही भागीदारी आहे. शाहरुखने नाइट रायडर्सचे शेअर 6 ते 8 पट कमी किंमतीत विकल्याचा आरोप असून याप्रकरणी ईडीने शाहरुख खानला 3 वेळा समन्स बजावला होता. मंगळवारी ईडीने शाहरुखची 3 तास चौकशी केली. शाहरुखने चौकशीत सहकार्य केलं असून त्याने खरेदीप्रक्रियेतील काही कागदपत्रही ईडीसमोर सादर केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...
Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2015 02:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close