केडीएमसीच्या महापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर

केडीएमसीच्या महापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर

  • Share this:

Kalayna mahapoury

11 नोव्हेंबर : शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र लढून निकालानंतर पुन्हा युती केलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र देवळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, उपमहापौरपदावर भाजपच्या विक्रम तरे यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णायक अधिकारी शेखर चन्ने यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

कल्याण-डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज (बुधवार) निवडणूक पार पडली. महापौरपदासाठी भाजपच्या राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांनी तो मागे घेतला, त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र देवळेकर विराजमान झाले. तर भाजपच्याच विशाल पावशे यांनी अर्ज मागे घेतलेल्यामुळे विक्रम तरेंची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.

महापौर निवडणुकीत राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष होतं. मात्र मनसे नगरसेवकांनी सभागृहात हजेरीच लावली नाही. कल्याण ण डोंबिवली निवडणूक स्वतंत्र लढलेल्या शिवसेना- भाजपने निवडणुकीनंतर मात्र युती केली.

120 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक 52 जागा जिंकल्या तर भाजपला 42 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे महापौरपदासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ सहज पार झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: November 11, 2015, 1:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading