महापौरांनी उद्घाटन केलेल्या हॉटेलात हुक्का?

  • Share this:

snehal ambekar

महापौर स्नेहल आंबेकरांनी एका रेस्टारेंट उद्घाटन केल्यानं वाद निर्माण झाला. महापौरांनी उद्घाटन केलेलं हे रेस्टोरंट नसून हुक्का पार्लर असल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडेनी केला. तर संदीप देशपांडेंनी आरोप सिद्ध करवेत नाहीतर त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचं रेस्टोरंटचे मालक जमीर काजी यांनी म्हटलं आहे.

इस्माईल खोपेकर मार्गावर डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकासमोर एका दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर उस्तादी चारकोल लाऊंज नावाचे हॉटेल थाटण्यात आलं आहे. 6 नोव्हेंबर रोजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते या हॉटेलचा उद्घाटन करण्यात आलं.

विशेष म्हणजे या उद्घाटनाला ज्येष्ठ वकील उज्वल निकम, स्थानिक आमदार वारिस पठान आणि सह पोलिस आयुक्त खंडेराव पाटीलही उपस्थित होते. महापौरांनी या हॉटेलचं उद्घाटन केल्यानं त्यापुन्हा एकादा वादाच्या भौर्‍यात सापडल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2015 09:08 PM IST

ताज्या बातम्या