शिवसेनेची माघार

शिवसेनेची माघार

5 फेब्रुवारीआयपीएलबाबत आज शिवसेनेने माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीयांवर होणार्‍या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंना खेळूच न देण्याची भूमिका शिवसेनेने घेतली होती. पण आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी 'मातोश्री' जाऊन बाळासाहेबांशी चर्चा केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विरोध करण्याची भूमिका शिवसेनेने बदलल्याचे समजते. खरे तर आज संध्याकाळी शरद पवारांनी सगळ्यांनाच धक्का दिला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारतात खेळण्यास विरोध करणार्‍या बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी दुपारी औरंगाबादमध्ये चांगलीच खिल्ली उडवली. आणि संध्याकाठी मुंबईत येऊन ते थेट बाळासाहेबांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पवार आणि बाळासाहेबांची तब्बल 2 तास चर्चा झाली. आयपीएलने लेखी स्वरुपात भूमिका मांडावी. शिवाय आयपीएलचे प्रेझेंटेशन पाहिल्यानंतरच 2 दिवसांनी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे बाळासाहेबांनी सांगितल्याचे शशांक मनोहर यांनी 'मातोश्री'च्या बाहेर आल्यावर सांगितले होते.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2010 04:53 PM IST

ताज्या बातम्या