पवार 'मातोश्री'वर तब्बल 2 तास

पवार 'मातोश्री'वर तब्बल 2 तास

5 फेब्रुवारी'मातोश्री'वर तब्बल दोन तास थांबून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बाहेर पडलेत. बाहेर पडल्यावर त्यांना मीडियाने गराडा घातला. पण पवारांनी काहीही बोलायला नकार दिला. पण बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी मीडियाशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना भारतात खेळू देण्याची विनंती आम्ही ठाकरेंना केली. आयपीएलमध्ये प्रत्येक टिममध्ये 2 ते 3 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू असतात. त्यात भारतीय खेळाडूही असतात. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात खेळू द्यावे, अशी विनंती आम्ही बाळासाहेबांना केली. त्यावर मला लेखी स्वरुपात तुमची भूमिका सादर करा, आम्ही त्यावर 2 दिवसांनी विचार करून काय ते ठरवू असे आश्वासन बाळासाहेबांनी दिल्याचे मनोहर यांनी सांगितले. या दोन बड्या नेत्यांमध्ये चर्चा झालीय. त्यामुळे यावर निर्णय केवळ बाळासाहेबच घेतील, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2010 03:42 PM IST

ताज्या बातम्या