08 नोव्हेंबर : ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्येप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांचीही चौकशी झालीये. स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांची शनिवारी चौकशी करण्यात आली आहे. शनिवारी दिवसभर ही चौकशी सुरू होती. नगरसेवक नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण हे कागदपत्रांसह चौकशीला सामोरे गेले. सूरज परमार आत्महत्या प्रकरणात आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोट मध्ये चार नगरसेवकांची नावे लिहून खोडण्यात आली होती. 23 तारखेपर्यंत मुंबई हायकोर्टाने या नगरसेवकांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आता हा तपास दिवसेंदिवस वाढणार असून आणखी लोक या चौकशीच्या फेर्यात अडकणार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |