सत्तावाटपात नवा ट्विस्ट, राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर ठेवल्या 'या' अटी

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील संभाव्य महाआघाडीतही सत्तावाटपाचा नवा तिढा निर्माण झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच न सुटल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. पदांच्या समसमान वाटपाचा मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपपासून फारकत घेतली. मात्र त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील संभाव्य महाआघाडीतही सत्तावाटपाचा नवा तिढा निर्माण झाला आहे.

'जरा दमानं घ्या,' असं म्हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेसोबत सत्तावाटप करण्यासाठी पुरेसा वेळ घेण्याचं ठरवलं आहे. सत्तेतील पदांपासून ते अनेक राजकीय भूमिकांबद्दल सुवर्णमध्य कसा साधला येईल, याबाबत आता खलबतं सुरू झाली आहेत. यातच राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर काही अटी ठेवल्याची माहिती आहे.

भाजपसमोर सत्तावाटप करताना शिवसेनेनं 50-50 चा फॉर्म्युला ठेवला होता. आता तोच फॉर्म्युला राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर ठेवला आहे. राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या मागणीला शिवसेना कसा प्रतिसाद देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'शिवसेनेपेक्षा आमचे केवळ दोन आमदार कमी आहेत. त्यामुळे अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदासाठीचा आमचा दावा चुकीचा नाही,' असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा तर नंतरची अडीच वर्ष राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, काहीही झालं तरी आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू असं ठाम मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तर युती तुटली का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंकडून बगल देण्यात आली आहे. भाजपसोबत जाणार का? किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर कोणतीही माहिती देण्यास उद्धव ठाकरेंनी घाई नाही. थोड्या वेळ थांबा अशी प्रतिक्रिया दिली आहे. द रिट्रीट या हॉटेलवर आमदारांची बैठक पार पडल्यानंतर शिवसेनेकडून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आम्ही याआधी आघाडीला पाठिंबा देण्यासाठी फोन किंवा संपर्क केला नाही हे काँग्रेसने त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं. त्यामुळे भाजपचा आरोप खोटा असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. युती जर तुटली असेल तर ती भाजपनेच तोडली आणि भाजप हा पर्याय संपला असेल तर तो भाजपनेच संपवला असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. युतीमध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री हा महत्त्वाचा मुद्दा होता. पण यावर भाजप खोटं बोलली आणि मला खोटं पाडलं. हे सगळं संतापजनक असल्याची प्रतिक्रियाही यानेळी उद्धव ठाकरेंनी दिली.

शिवसेनेचा नेमका गेम कुणी केला? पडद्यामागे नेमकं काय घडतंय? पाहा SPECIAL REPORT

First published: November 13, 2019, 11:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading