बारामतीत चार्‍याअभावी 1500 गायींची मृत्यू यातना !

 बारामतीत चार्‍याअभावी 1500 गायींची मृत्यू यातना !

  • Share this:

4baramati _gai06 नोव्हेंबर : काही दिवसांपासून गाय देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलीये. यावरून द्वेषाचं राजकारण होतंय. पण या देशातल्या गायी धर्माच्या नाही तर अनास्थेच्या बळी ठरत आहेत.

याचंच एक उदाहरण आहे बारामतीमधलं.. बारामतीमधल्या सह्याद्री काऊ फार्ममधल्या 1500 गाई अक्षरशः वार्‍यावर आहेत. प्रमोद गोएंका यांच्या डायनॅमिक्स डेअरीचं हे फार्म आहे. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून या गायींकडे सपशेल दुर्लक्ष केलं जातंय.

शेतकर्‍यांना चार्‍याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे गायींचा चार्‍याचा पुरवठा बंद झालाय. त्यांना गेल्या 15 दिवसांपासून चारा पाणी मिळत नाहीये.

इतकंच नाही तर वैद्यकीय उपचारही मिळत नाहीत. सध्या गाई अत्यंत खंगलेल्या अवस्थेत फिरत आहेत, खायला काही

नसल्यामुळे उपचार नसल्यामुळे रोज 4 ते 5 गाई मरत असल्याच काही ज्येष्ठ नेत्यांनी खासगीत मान्य केलं. शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना त्यांच्या पुढाकारानं हे फार्म सुरू करण्यात आलं होतं.

गोएंका यांच्या डायनॅमिक्स डेअरीला दूध मिळावं हा त्यामागचा हेतू असल्याचं सांगण्यात येतं. दुसरीकडे शेतकर्‍यांचे गेले 6 महिन्यांचे चार्‍याचे 50 लाख रुपये थकवलेत. त्यामुळे शेतकरी आंदोलन करताहेत. मात्र, त्यांच्या वाट्याला फक्त उपेक्षाच येतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: November 6, 2015, 7:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading