ही तर गल्लीतील भो..भो..!

ही तर गल्लीतील भो..भो..!

7 फेब्रुवारीमुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढली तर नरडीचा घोट घेऊ...अरे लेका, कोण मंुबई वेगळी करायला निघालाय? उगाच नसते विषय उकरायचे...पाकिस्तानी खेळाडूंना भारतात खेळू देणार नाही, असे म्हणतात.आता काय पाकिस्तानात जाणार्‍या हिंदुस्थानच्या हॉकीच्या टीमलाही पुन्हा बोलवायचे का? हे तर रडीचे खेळणे झाले...ऑलिम्पिकला भारतीय टीम जाणार, तिथे पाकिस्तानी खेळाडू नसणार काय?...ऑस्ट्रेलियातील हल्ल्यांबद्दल केंद्र सरकार ऑस्टे्रलियाशी योग्य तो संवाद ठेवून आहे..तर हे म्हणतात...आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंना खेळू देणार नाही...अरे खेळू द्या की..दोन पोरे खेळली तर काय बिघडतं? अशी चौफेर टोलेबाजी केली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी! निमित्त होते, औरंगाबाद इथे सुरू असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर. कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहून मग घरच्याच खेळपट्टीवर पवारांनी आणखी षटकार ठोकले...टार्गेट होते, शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे. काही प्राणी असतात. ते घराजवळ दुसरे कुणी आले की गुरगुरतात...शिवसेनेचे सध्या असे चालले आहे. नवाबभाईंनी 'मातोश्री'वर गेलेल्या मियाँदाद या 'व्याह्या'बद्दल व्यवस्थित मराठीतून सांगितले...आता मी बाळासाहेबांना भेटणार आहे. आणि सांगणार आहे की, नका खेळात राजकारण आणू..वय झाले...नव्या पिढीला काही तरी राष्ट्रीय विचार सांगा..आम्ही एकमेकांवर जोरदार टीका करतो. पण आमची मैत्री जुनी आहे...अशी फटकेबाजी करत पवारांनी बाळासाहेबांना हा पे्रमाचा सल्ला दिला आहे. आता पवार कधी 'मातोश्री'वर जाणार, कधी बाळासाहेबांना सल्ला देणार, आणि बाळासाहेब त्यांना काय उत्तर देणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2010 11:53 AM IST

ताज्या बातम्या