कल्याण डोंबिवली महापालिकेत युतीची सत्ता?

कल्याण डोंबिवली महापालिकेत युतीची सत्ता?

  • Share this:

sena-bjp-kdmc789

06 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनेविषयीच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपने कल्याण-डोंबिवली महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी पावले टाकायला सुरुवात केल्यानंतर हातातील सत्ता जाऊ नये यासाठी शिवसेनेने एक पाऊल मागे घेतला आहे. भाजप- शिवसेनेची सत्ता स्थापनेसाठी काल (गुरूवारी) रात्री पहिली बैठक पार पडली आहे. औरंगाबाद पॅटर्न प्रमाणे सत्ता स्थापन होऊ शकते का याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या दोन नेत्यांमध्ये रात्री बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेनेच्या प्रस्तावावर भाजपच्या नेत्यांची बैठकीत चर्चा झाली.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी स्पष्ट बहुमत नसल्याने त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करता येत नाही. शिवसेने खालोखाल भाजप दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यात भाजपने मनसेला बरोबर घेऊन सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या. भाजपचे हे प्रयत्न यशस्वी झाले तर हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास निसटून जाईल, या भीतीपोटी शिवसेनेने एक पाऊल मागे येत भाजपसमोर सत्तास्थापनेसाठीचा प्रस्ताव ठेवला असल्याचे सांगण्यात येते.

पहिला महापौर कोणाचा, हा मुद्दाही कळीचा ठरला होता. आज होणार्‍या चर्चेत हा मुद्दाही प्राधान्याने चर्चिला जाणार असल्याचं समजतं. शिवसेनेकडून चर्चेचा प्रस्ताव भाजपपुढे ठेवल्याने सत्ता स्थापनेच्या हालचालींना शुक्रवारपासून वेग येणार आहे. चर्चेच्या फेर्‍यातून लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असा विश्वासही भाजपच्या सूत्रांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: November 6, 2015, 8:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading