S M L

निकालानंतर चंद्रकांत पाटलांना सेना आठवली, विकासासाठी युती करणार !

Samruddha Bhambure | Updated On: Nov 2, 2015 05:41 PM IST

FMNAIMAGE31440Kolhapur_Chandrakant Patil

02 नोव्हेंबर : कोल्हापुरात निवडणूक संपताच भाजपला आपले मित्र पक्षाची आठवण झाली आहे. विकासासाठी एकत्र येण्याचं आवाहन भाजपचे नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला केलंय.

कोल्हापूर महापालिकेसाठी रविवारी तब्बल 70 टक्के मतदानाची नोंद झाली होती. भरघोस मतदानाच्या जोरावर निकाल काय लागणार याची उत्सुकता सर्वांनी लागली होती. मात्र, काँग्रेसने आघाडी घेत सर्वाधिक 27 जागा जिंकल्या आहे. तर भाजपने 12 आणि ताराराणी आघाडीने 20 जागा पटकावल्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने 15 आणि शिवसेनेनं फक्त 4 जागांवर विजयी झाली आहे.पण, बहुमतासाठी जादुई 41 जागांचा आकडा कुणालाही गाठता आला नाही. एकीकडे काँग्रेसने राष्टवादीची मदत घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आता शिवसेनेचे आठवण झालीये. विकासासाठी शिवसेनेसोबत युती करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट करून टाकलंय. पण त्याचं बरोबर महापौर हा भाजपचाच होणार असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिवसेना -भाजपमध्ये चांगलाच सामना रंगला होता. चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री पदावरुन हटवण्याची मागणी शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांनी केली होती, तर ही मागणी करणार्‍या नीलम गोर्‍हे कोण? असा उलट सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारला होता. तसंच गेल्या 25 वर्षांपासून आम्ही शिवसेनेला सहन करतोय, पण लवकरच आमचा स्फोट होऊ शकतो, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. पण आता निवडणूक संपताच भाजपला पुन्हा आपल्या मित्र पक्षाची आठवण झाल्याचं चित्र दिसत आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 2, 2015 05:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close