News18 Lokmat

कोल्हापुरात काँग्रेस -राष्ट्रवादी एकत्र येणार

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2015 09:41 PM IST

कोल्हापुरात काँग्रेस -राष्ट्रवादी एकत्र येणार

!function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?'http':'https';if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p"://platform.twitter.com/widgets.js";fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document,"script","twitter-wjs");

// ]]>

Congress NCp

02 नोव्हेंबर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला. मात्र,काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. काँग्रेस 27 जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीने 15 जागा जिंकल्यात.  त्यामुळे काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी आपल्या मित्रपक्षाला हाक दिलीये.

काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली असून राष्ट्रवादीला सत्तेत सहभागाबद्दल विनंती केली असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली. आयबीएन लोकमतशी बोलतांना सतेज पाटील यांनी राष्ट्रवादी मागील वेळीही सोबत होती. त्यामुळे त्यांनी यावेळी सोबत यावं अशी इच्छा बोलून दाखवली.

तर दुसरीकडे ताराराणी पक्षाने 20 जागा जिंकून दुसऱ्या स्थान पटकावले. ताराराणीने महायुतीचा महापाैर होईल असा दावा करत महायुतीच्या हालचालींना सुरुवात केली. पण आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तेसाठी एकत्र येण्याची तयारी सुरू केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 2, 2015 04:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...