नागपुरात नंबर वनसाठी लढाई

नागपुरात नंबर वनसाठी लढाई

4 फेब्रुवारीदक्षिण आफ्रिकेच्या भारत दौ-याला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची पहिली टेस्ट शनिवारपासून नागपुरात रंगणार आहे. आणि ही लढाई असणार आहे ती नंबर वनची. टेस्ट क्रमवारीतले नंबर वन पद या सिरिजमध्ये पणाला लागले आहे. सीरिजमधील काही महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत- -भारतीय टीमने दोन्ही टेस्ट ड्रॉ केल्या तरी टीमचा अव्वल क्रमांक कायम राहणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेनं एक टेस्ट जरी जिंकली आणि दुसरी ड्रॉ केली तरी आफ्रिकन टीम अव्वल स्थानावर पोहोचेल.- भारतीय टीमचे सध्या 124 पॉइंट्स झालेत. तर दुस- नंबरवर असलेल्या आफ्रिकन टीमच्या खात्यात 120 पॉइंट्स आहेत.-या सीरिजमध्ये 1 लाख 75 हजार अमेरिकन डॉलरही पणाला लागलेत. कारण, येत्या 1 एप्रिलला आयसीसी अधिकृतपणे या वर्षीची नंबर वन टीम जाहीर करणार आहे... आणि त्या टीमला ही पुरस्काराची रक्कम मिळणार आहे. -त्यामुळे हा पुरस्कार कोण पटकावणार हे अर्थातच या सीरिजनंतर ठरणार आहे.- शिवाय, टेस्टमधील नंबर वन बॅट्समनसाठी ग्रॅम स्मिथ आणि गौतम गंभीर यांच्यात चुरस आहे. ही झुंजही आगामी सीरिजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2010 12:20 PM IST

ताज्या बातम्या