मनसे कार्यकर्त्यांनी बँक मॅनेजरला काळं फासलं

मनसे कार्यकर्त्यांनी बँक मॅनेजरला काळं फासलं

  • Share this:

buldhana_mns31 ऑक्टोबर : बुलडाणा जिल्ह्यातील दातालामधील सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील मॅनेजरला मनसे कार्यकर्त्यांनी तोंडाला काळं

फासलंय.

पुंजाजी कदम या शेतकर्‍यांनी किरणा दुकानासाठी बँकेत 1 लाखांचं कर्ज मिळावं यासाठी अर्ज केलं होता. या कर्जासाठी सबसिडी म्हणून कदम यांनी 20 हजारांचा चेक देखील बँकेत दिला. मात्र, अचानक बँक मॅनेजरने कर्ज देण्यास नकार दिला.

कर्ज पास करण्यासाठी मॅनेजरने शेतकरी कदम यांच्याकडून पैसे मागितले होतं, असा आरोप कदम यांनी केलाय. म्हणून या प्रकरणाचे जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मॅनेजरने उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी मॅनेजरच्या तोंडाला काळे फासले आणि त्यांचा निषेध केला.मात्र, आपण कदम यांना 50 हजारांचं कर्ज मंजूर केल्याचं बँक मॅनेजरचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 31, 2015, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading