S M L

खैरलांजी घडलं तेव्हा पुरस्कार का परत केले नाही ? -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Oct 30, 2015 10:13 PM IST

ibnlokmat_agenda_maharashtra_2015_event (33)30 ऑक्टोबर - 'अजेंडा महाराष्ट्र' हा विशेष कार्यक्रम आज मोठ्या दिमाखात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याच्या भूमिकेवर भाष्य केले. साहित्यिकांनी कुण्या एकाची बाजू घेणं सुरू केलंय. अशामुळे समाजाला कुणीच वाचवू शकत नाही, अशी थेट प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच साहित्यिक, कलावंतांबद्दल आदरच आहे. पण खैरलांजी घडलं तेव्हा पुरस्कार परत केले नाहीत.मोदींच्या राज्यातच हे जाणीवपूर्वक केलं जात आहे, अशी टीकाही त्यांनी केलीये.

शेतकर्‍यांवर अस्मानी संकट गंभीर आहे अशी कबुली देत शेतकर्‍यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभं राहिलं. गेल्या नऊ महिन्यात 6 हजार गावांमध्ये पाण्याचं नियोजन केलं आहे. शेतकर्‍यांना वर्षभरात 1 लाख 20 हजार वीज कनेक्शन दिले आहेत. शेतकर्‍यांना कर्जपुरवठाही केला जाईल. आतापर्यंत शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 8 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे वाटण्यात आले आहे. 67 लाख शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळाला असून 54 लाख हेक्टर शेतीचा वीमा काढला आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

तसंच दरवर्षी 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना राज्यातील नामांकित विद्यालयात प्रवेश दिले आहे. 15 वर्षांनंतर सुरुवात केली आहे काही अडचणी, अडथळे आहे ते पार करून काम करावं लागणार आहे. 5 वर्षांत महाराष्ट्राला नवी दिशा देणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी शिवसेनेनं गुलाम अली आणि खुर्शीद कसुरी यांच्या कार्यक्रमाला विरोध करत राडा घातला. मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य करत शिवसेनेला चांगलंच फटाकारलं. निखळ कलावंतांना देशाची सीमा नसते. आपलेही कलाकार इतर देशात जात असतात. आपल्या देशात बाहेरुन आलेल्या कलाकारांना संरक्षण देणं हे आपलं काम आहे. भावना आणि सन्मान दोन्ही गोष्टींचा समतोल राखला गेला पाहिजे असं स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...
Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2015 10:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close